राहुरी फॅक्टरी(वेबटीम) अहिल्यानगर जिल्ह्यात गोरक्षणाचा वसा घेणारे हिंदुजनसेवक आ. संग्रामभैय्या जगताप व हिंदूधर्मरक्षक सागरभैय्या बेग यांच्या...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
अहिल्यानगर जिल्ह्यात गोरक्षणाचा वसा घेणारे हिंदुजनसेवक आ. संग्रामभैय्या जगताप व हिंदूधर्मरक्षक सागरभैय्या बेग यांच्या हस्ते राहुरी फॅक्टरी येथील प्रशांतभाऊ कोठुळे यांच्यावतीने गोरक्षक बंटीभाऊ पटारे यांच्या कडे गोरक्षनाथ गड येथील गोशाळेस १ गाडी चारा सुपूर्त करण्यात आला.
यावेळी आ. संग्राम भैय्या जगताप म्हणाले की, ३ पासून बंटी पटारे यांनी गोरक्षनाथ गडावरील गोमंतासाठी चारा संकलित करण्याचा उपक्रम राबवित आहे. आज राहुरी फॅक्टरी येथील प्रशांत कोठुळे व परिवाराने चारा गाडी देऊन सामाजिक दायित्व जोपासले हे प्रेरणादायी आहे. सर्व तरुण बांधवांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन गोसेवेला प्राधान्य द्यावे असे सांगितले.
यावेळी विठू राऊत, दत्ता साळुंखे, संदीप कोठुळे, प्रशांत मुसमाडे, जगदीश वरखडे, शाम सूर्यवंशी, ऋषिकेश उंडे, आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत