राहुरी(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये सेवा करण्याचे भाग्य लाभल्याने यापुढे यामध्ये काम करत असताना देश सेवेचा अनुभव मिळणा...
राहुरी(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये सेवा करण्याचे भाग्य लाभल्याने यापुढे यामध्ये काम करत असताना देश सेवेचा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे हे काम देखील देश सेवा म्हणून आम्ही पार पाडू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतुक निरीक्षक युवराज पवार यांनी व्यक्त केले आहे. ते वळण येथे बोलत होते.
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण येथील तरुण दत्तात्रय सदाशिव आढाव यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक म्हणून निवड झाल्याने त्यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा यांचा वळण ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागाचे वाहतुक निरीक्षक युवराज पवार, प्रमोद पवार, सुनील भोसले, सुनील शेळके, विशाल गोडसे, विकास भोसले, नितीन पालवे, शहादेव रायते, ज्ञानेश्वर दराडे, निलेश खळदकर, गणेश मोरे, माधव माने, भैरवनाथ लोमटे, अमोल बाबर, विशाल बाबर, विनोद कापणीस, भागवत गरजे, प्रवीण माने, भारत साके, दिनेश भुसारे, अंकुश गर्जे, श्रीधर बोराटे, मोन्नपा सुतार, दीपक शेलार, मनोज पाटील, दत्तात्रय निकम,अशोक करडुके, कृष्णा निकम,चांद शेख हे उपस्थित होते. तर गावातील ग्रामस्थांमधे भाजप मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष धनंजय आढाव, सोसायटीचे चेअरमन संजय आढाव, संचालक उमेश खिलारी, पञकार गोविंद फुणगे,राधेश्याम खिलारी, सुदाम कारले, आदिनाथ काळे, अविनाश बनकर, अशोक शेळके, विजय बनकर, आदिनाथ कारले, विशाल खुळे, गणेश आढाव, सुनील खुळे, संदीप खुळे, सोहम आढाव आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत