संगमनेर(वेबटीम) संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथील सुपुत्र मेजर रामदास साहेबराव बढे (वय-३४लयांनी जम्मू-काश्मीरमधील तंगधर या अतिदुर्गम भागात दे...
संगमनेर(वेबटीम)
संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथील सुपुत्र मेजर रामदास साहेबराव बढे (वय-३४लयांनी जम्मू-काश्मीरमधील तंगधर या अतिदुर्गम भागात देशसेवा बजावत असताना वीरमरण पत्करले. त्यांनी भारतीय सैन्याच्या महत्त्वाच्या मोहीमेतील कर्तव्य बजावत असताना सीमारेषेवर शौर्याने लढा देत आपले प्राण अर्पण केले.
या दुःखद घटनेने संगमनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासन, जनप्रतिनिधी आणि नागरिकांनी मेजर बढे यांच्या बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचे पार्थिव २६ मार्च रोजी दुपारी १ वा मूळगावी आणण्यात येणार असून संपूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार होणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत