भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

श्रीरामपूर/वेबटीम:- श्रीरामपूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या शिबिर...

श्रीरामपूर/वेबटीम:-

श्रीरामपूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे संघटक व नाशिक जिल्हा प्रभारी गौरव पवार यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे लुंबिनी बुद्ध विहारात शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी संपन्न झाले.या शिबिरा साठी अहिल्यानगर उत्तर विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे तसेच  नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर व त्यांची संपूर्ण कार्यकारणी यांच्या उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुध्द व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिशरण व पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शांताराम रणशुर यांनी या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक गौरव पवार यांचा सत्कार केला तर माजी जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे यांचा सत्कार नवनिर्वाचित सरचिटणीस नरेंद्र पवार यांनी केला. त्यानंतर नुकत्याच निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व केंद्रीय शिक्षक शिक्षिकांचा सत्कार सर्वांचे मार्गदर्शक गौरव पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला यावेळी पहिल्या सत्रामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे उद्दिष्ट,

भारतीय बौद्ध महासभेचे अधिकार,तर दुसऱ्या सत्रामध्ये संस्थेचे कामकाज कार्यकर्त्यांची जबाबदारी

,पदांची जबाबदारी,सर्व पदाचे महत्त्व व जबाबदाऱ्या, कार्यकर्ता कसा असावा व संख्येची आचारसंहिता तसेच संस्थेचा बॉयलाज व संविधान यांचे महत्त्व सर्वांना समजेल अशा सरळ व सोप्या भाषेत समजावून सांगितले या शिबिरासाठी अध्यक्ष शांताराम रणशूर सरचिटणीस नरेंद्र पवार कोषाध्यक्ष नानासाहेब बनकर, उपाध्यक्ष संस्कार,

संदीप त्रिभुवन, उपाध्यक्ष प्रचार पर्यटन गौतम पगारे उपाध्यक्ष, संरक्षण अतिष त्रिभुवन, हिशोब तपासणीस विजय जगताप, कार्यालयीन सचिव लक्ष्मण म्हस्के,सचिव संस्कार प्रदीप आढाव, सचिव संस्कार विजय भोसले,सचिव प्रचार पर्यटन कैलास लोखंडे ,सचिव प्रचार पर्यटन रावसाहेब पराड सचिव संरक्षण रवींद्र जगताप सचिव संरक्षण अण्णासाहेब जगताप, संघटक विश्वास जमधडे,

संघटक रमेश निकम,संघटक भिमराव कदम संघटक सुरेश देठे,संघटक चंद्रकांत संसारे, संघटक अशोक बोराडे संघटक बिपीन गायकवाड,

केंद्रीय.शिक्षक रामदास सोनवणे,अण्णासाहेब झिने, बौध्दाचार्य.रामदास मगर,खंडोबा दाभाडे,संतोष बनसोडे,छबू बनकर, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली अहिरे, लिला त्रिभुवन आदी सदर शिबिरासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण दिवसभरामध्ये देण्यात आलेल्या माहिती बाबत प्रशिक्षणार्थींकडून त्यांना काय समजले याबाबत पडताळणी घेण्यात आली त्यानंतर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की सर्वांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध महासभेचे कार्य तळागाळा मध्ये पोहोचून अहिल्यानगर उत्तरेचे नाव प्रकाशाच्या झोकात आणू असे आश्वासन दिले शेवटी सरनतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस नरेंद्र पवार यांनी केले तर उपस्थित कार्यकर्ता प्रशिक्षणार्थींचे आभार शांताराम रणशूर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत